पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज राष्ट्रीय शैक्षणिक संग्रहालयाच्या स्थापनेला आज मंजूरी देण्यात आली. येत्या तीन महिन्यात या संग्रहालयाची स्थापना होऊन ते कार्यरत होईल आणि 2017-18 या वर्षात देशभरात सक्रीय होईल.
सुरक्षा ठेवींच्या धर्तीवर उच्च शैक्षणिक संस्थांसाठी शालेय प्रमाणपत्रे, पदव्या आणि इतर शैक्षणिक पुरस्कार जतन करण्यासाठी डिजिटल संग्रहालय निर्माण करण्याचे सुतोवाच वित्त मंत्र्यांनी 2016-17 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात केले होते. या संग्रहालयाच्या स्थापनेद्वारे ते पूर्ण केले जात आहे.
एनएसडीएल डाटाबेस व्यवस्थापन मर्यादित आणि सीडीएसएल संयुक्त उपक्रम या दोन संस्थांद्वारे राष्ट्रीय शैक्षणिक संग्रहालयाचे कार्य चालविण्यात येणार असून उपरोक्त दोन्ही कंपन्यांची नोंदणी सेबी कायदा 1992 द्वारे करण्यात आली आहे.
संग्रहालयात अपलोड केल्या गेलेल्या माहितीच्या विश्वासार्हतेसाठी संबंधित शैक्षणिक संस्था जबाबदार राहतील. राष्ट्रीय शैक्षणिक संग्रहालयात शैक्षणिक संस्था, मंडळे, विद्यार्थी तसेच बँका, कंपन्या, शासकीय संस्था आणि शैक्षणिक संस्थांचे वापरकर्ते नोंदणी करु शकतील.