नरेंद्र मोदी यांचे काम आणि त्या अनुषंगाने त्यांचा होणारा प्रवास बघता, त्यांना चित्रपट पाहायला वेळ न  मिळणे हे स्वाभाविक  आहे. मोदींनी मुलाखतीमध्ये सांगितल्याप्रमाणे, माझा चित्रपट ण्‍कडे जास्त कल नाही, परंतु सर्वसाधारणपणे तरुणांमध्ये जे चित्रपटांचे कुतूहल असते त्यातूनच मी माझ्या तरुणपणी चित्रपट पाहायचो. असे असले तरीही, केवळ करमणूक म्हणून चित्रपट पहायचा हा कधी माझा स्वभाव नव्हता. त्याऐवजी, चित्रपटाच्या कथेतून जीवनासाठी धडा शोधण्याची सवय मी मला लावून घेतली. मला आठवते, मी एकदा माझे शिक्षक आणि मित्र यांच्यासोबत आर. के. नारायण यांच्या कादंबरीवर आधारित गाईड हा प्रसिद्ध हिंदी चित्रपट पाहायला गेलो होतो. आणि तो चित्रपट पाहिल्यानंतर मी आणि माझ्या मित्रामध्ये तीव्र वादविवाद झाला. माझा युक्तिवाद असा होता की, सरतेशेवटी, प्रत्येकाचा अंतरात्मा हा त्याला किंवा तिला मार्गदर्शन करतो ही या कथेची मध्यवर्ती कल्पना आहे. परंतु मी त्यावेळी खूपच तरुण असल्याने माझ्या मित्राने माझे म्हणणे त्यावेळी गांभीर्याने घेतले नाही! गाईड चित्रपटाने त्याला वेगळ्याच गोष्टीसाठी प्रभावित केले - दुष्काळाचे कटू सत्य आणि पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकऱ्याला येणाऱ्या अगतिकतेची दृश्य कल्पना. जीवनात नंतर, जेव्हा त्याला संधी भेटली, तेव्हा त्याने आपल्या आयुष्यातील बराच कालावधी गुजरातमध्ये जल संवर्धनासाठी संस्थात्मक उपाययोजनांना प्रोत्साहन देण्यासाठी घालविला. हा तोच प्रकल्प आहे जो त्याने नंतर राष्ट्रीय पातळीवर आणि तसेच त्याच्या पंतप्रधानाच्या भूमिकेत देखील राबवला.  

मोदी त्यांच्या कामामध्ये इतके गर्क असतात आणि त्यांच्या  कार्यालयीन कामांची पूर्तता हे त्यांचे प्रमुख प्राधान्य असल्याने  तेव्हा केवळ करमणूक म्हणून चित्रपट पाहणे ही शक्यता त्यांच्यासाठी नसतेच. असे असले तरी, ते कला आणि संस्कृती विश्वाच्या नेह्मीच संपर्कात असतात. एकंदर आपल्या सांस्कृतिक परंपरेमध्ये आपल्या कलाकारांच्या योगदानाचे मूल्य ओळखूनच गुजरातमध्ये पतंग महोत्सवासारख्या नाविन्यपूर्ण कल्पना तसेच नुकतेच इंडियागेट जवळ राजपथ लॉनवर आयोजित केलेला भारत पर्व या कार्यक्रमांना मोदींनी प्रोत्साहन दिले आहे.

मोदींचे आवडते गाणे १९६१ च्या ‘जय चित्तोड’ चित्रपटातील लता मंगेशकर यांच्या आवाजातील "हो पवन वेगसे उड़नेवाले घोड़े......" तसेच  भरत व्यास यांच्या प्रेरणादायी गीताला प्रभावीपणे एस. एन. त्रिपाठी यांनी संगीतबद्ध केलेले "तेरे  कंधोंपे  आज भार है मेवाड़का, करना पड़ेगा तुझे सामना पहाड़ का....हल्दी घाटी नहीं है काम कोई खिलवाड़का, देना जवाब वहाँ शेरोंके दहाड़का ......" हे मोदींचे आवडते गाणे आहे.