काँग्रेस नेते माधवराव सिंधिया यांच्यासोबत विमान अपघातात मृत्युमुखी पडलेले ज्येष्ठ कॅमेरामन गोपाल बिश्त यांच्या अंत्यसंस्काराना नरेंद्र मोदी उपस्थित होते, त्यावेळी त्याना एक फोन आला, तो फोन इतर कुणाचाही नव्हता तर तर खुद्द पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचाच होता.

‘तुम्ही कुठे आहात सध्या ?’ अटलजीनी विचारले

‘मी एका अंत्यसंस्कार सभेत आहे’, मोदींनी उत्तर दिले. ‘अरे, मग तुम्ही आता बोलू शकणार नाही’ अटलजी म्हणाले. मात्र त्यांनी नंतर मोदीना संध्याकाळी त्यांच्या घरी फोन केला. त्यानंतर जेव्हा अटलजी आणि मोदी यांची भेट झाली, तेव्हा अटलजी त्याना म्हणाले “दिल्लीततुमचेवजनखूपवाढलेआहे, तुम्ही आता गुजरातला परत जायला हवे.”

ह्या वाक्याचा अर्थ मोदीना नीट समजला, मात्र त्यांना पक्षाच्या या निर्णयाचे त्यांना अतिशय आश्चर्य वाटले. मोदीनी कधी आमदार म्हणूनही काम केले नव्हते, मात्र आता पक्षाने थेट मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी त्यांना दिली होती. मात्र जेव्हा देशाच्या पंतप्रधानानेच असा आग्रह धरला असेल, तेव्हा त्याला कोणी नकार कसा देऊ शकतो ?

नरेंद्र मोदींच्याच शब्दात सांगायचे झाल्यास, ते म्हणाले होते, मी गेल्या कित्येक वर्षांपासून गुजरातला गेलो नव्हतो. मी माझ्या सहकाऱ्यांना बोलावले आणि त्यांना सांगितले की तुम्ही मला बोलावताय मात्र , मी तिकडे कुठे राहू ? माझे स्वतःचे घरही नाही. त्यांनी मला सांगितले की माझी व्यवस्था ते सर्किट हाउसमध्ये करणार आहे, मी त्याना म्हंटले की मी आमदारही नाही, त्यामुळे मी त्याचे पूर्ण भाडे भरेन, तरच मी तिथे राहीन”.

अशाप्रकारे मोदी यांची गुजरातमधली मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द सुरु झाली.ते देशाचे सर्वाधिक काळ पदावर असलेले मुख्यमंत्री ठरले. त्यांनी चार वेळा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.