27 ऑक्टोबर 2013 हा दिवस खरे तर  वर्षातील इतर कोणत्याही रविवारप्रमाणे विस्मरणात गेला असता मात्र भाजपचे तत्कालीन पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या नियोजित सभास्थानी पाटणा येथील गांधी मैदानावर सभेपूर्वी झालेल्या भयंकर आणि दुर्देवी बॉम्ब स्फोटामुळे  तो काळा रविवार ठरला.

     उत्साही जमावाने सभेसाठी मैदानावर प्रवेश करायला सुरुवात केली आणि मैदानात एकामागोमाग एक बॉम्ब स्फोट झाले.

     जेव्हा नरेंद्र मोदी पाटणा येथे पोहोचले तेव्हा त्यांच्यासमोर दोन पर्याय होते.  एक तर सभेला संबोधित न करता गुजरातला परत जाणे (आणि मोठया प्रमाणावर भीतीच्या वातावरणात भर घालणे) किंवा सभेला संबोधित करणे.

     नरेंद्र मोदींनी सभेला केवळ संबोधित केले नाही तर हिंदू आणि मुस्लिमांना एकत्र येऊन परस्परांशी लढण्यापेक्षा गरीबीशी लढा देण्याचे भावपूर्ण आवाहन केले.  मोठया संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांनी शांतपणे परतावे  आणि कोणालाही कोणताही त्रास न देता शिस्त पालन करावे असे त्यांनी पुन्हा पुन्हा  सांगितले.

     मोदीजी जेथे उभे राहून भाषण देत होते त्या मंचाखालीच बॉम्ब ठेवण्यात आल्याचे नंतर स्पष्ट झाले.

     सभेला अनेक आठवडे लोटल्यानंतर मोदी म्हणाले, “माझ्या संस्थांत्मक अनुभवाने मला शिकवले आहे. सभास्थानी  एखादे जनावर स्वैर सुटले असल्याची अफवासुध्दा मोठा गोंधळ घालू शकते.  मग जर त्या ठिकाणी बॉम्ब आहे अशी अफवा पसरली असती किंवा मी त्या सभेला संबोधित केले नसले तर काय झाले असते. मंचावर जायचे किंवा नाही याबाबत माझ्या मनात कोणतेही प्रश्नचिन्ह नव्हते”.

     घटनेला आठवडा उलटल्यानंतर बॉम्ब स्फोटात आपल्या प्रियजनांना गमावणाऱ्या  कुटुंबांची भेट घेण्यासाठी  मोदी पुन्हा पाटणा येथे गेले.

     पाटणाची हुंकार सभा ही कलाटणी देणारी सभा म्हणून स्मरणीय ठरली.  सर्वात जास्त विपरीत परिस्थितीत खरे नेतृत्व कसे असावे हे त्या प्रसंगाने उत्तम प्रकारे दाखवून दिले. गरीबीशी  लढा दिला पाहिजे परस्परांशी नाही  हा संदेश अनेक भारतीयांच्या मनावर आणि हृदयांवर कोरला गेला.