नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान होण्यापूर्वी एक अभिनव क्षेत्र आयोजक होते, हे सर्वज्ञात आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणूकीपासून संसदीय निवडणूकीपर्यंत ते आयोजन कार्यात सहभागी होते.

1980 मध्ये गुजरात भाजपा संघटनेचा एक महत्वपूर्ण सदस्य म्हणून काम करत, अहमदाबाद महानगरपालिका निवडणुकीत त्यांनी मिळवून दिलेल्या विजयावरून त्यांच्या नाविन्यपूर्ण आयोजन कौशल्याची उत्तम ओळख पटते.

संघटनात्मक पध्दतीत नावीन्य आणताना त्यांनी दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित केले. प्रत्येक कार्यकर्त्याकडे ध्येय गाठण्यासाठी काम असेल, याची खातरजमा करणे आणि ध्येय निश्चित असलेले प्रत्येक काम पूर्ण करण्यासाठी कार्यकर्ता असेल, याची खातरजमा करणे, हा पहिला भाग होता. तर मोहीमेशी भावनात्मक जवळीक असेल याची खातरजमा करणे हा दुसरा भाग होता. शहर आणि त्याच्या प्रशासनासंदर्भात स्वामित्वाच्या भावनेची जाणीव करून देत त्या भावनिक जवळीकीला प्रेरणा देण्यास ते सक्षम होते.

त्या मोहिमेदरम्यान अहमदाबादमध्ये कार्यकर्त्यांसोबत सुक्ष्म बांधिलकी आणि समुदाय स्तरावरील १००० गट-बैठकांच्या माध्यमातून नागरिकांचा समावेश, हे त्यांच्या समुदाय संघटनाचे वैशिष्ट्य होते. समुदाय स्तरावरील या १००० गट बैठकांची पूर्वतयारी म्हणून त्यांनी १०० कार्यकर्ता स्वयंसेवकांसाठी एका प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे आयोजन केले. समुदाय स्तरावरील गट बैठकांमध्ये कार्यकर्त्यांनी काय करणे अपेक्षित आहे, कोणते मुद्दे अधोरेखित करायचे आहेत आणि कोणत्या विषयावर चर्चा करायची आहे, यावर या प्रशिक्षणादरम्यान लक्ष केंद्रित करण्यात आले.

निवडणूक धोरणाबाबत विचार करता हे अभिनव आणि पुरोगामी पाऊल होते.

समुदाय स्तरावरील समूह बैठकांमध्ये 25 ते 30 वर्षे वयोगटाच्या नागरिकांचा समावेश असे, जेथे वाकबगार वक्त्यांना शहराशी संबंधित प्रश्नांवर बोलण्यास प्रोत्साहन दिले जात असे. या प्रक्रियेत महिलांना समाविष्ट करण्यासाठी त्यांनी दुपारी २ वाजल्यानंतर सर्व महिला गटांच्या बैठका सुरू केल्या. महानगरपालिका निवडणुकीच्या मोहीमेत येण्यासाठी त्यांनी अगदी अटलबिहारी वाजपेयींचेही मन वळविले.

क्षेत्र आयोजनासंदर्भात नरेंद्र मोदी यांच्या पवित्र्याच्या वैशिष्ट्याबाबत सांगण्यासारखे असे बरेच काही आहे. स्वयंसेवक प्रशिक्षणाची आराखडा प्रक्रिया तसेच स्थानिकांशी भावनिक जवळीक यांचा मेळ साधत स्वयंसेवकांची जमवाजमव केल्यामुळे अहमदाबाद महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत भाजपच्या विजयाच्या दृष्टीने अनुकुल परिस्थिती निर्माण झाली आणि त्यातून नरेंद्र मोदींना स्थानिक स्तरावर सूक्ष्म लक्ष केंद्रित करत संघटनेचे राज्यव्यापी आयोजन करण्याचा दांडगा अनुभव प्राप्त झाला.

आधी गुजरातमध्ये, नंतर सरचिटणीस म्हणून लोकसभा निवडणुकीत आणि त्यानंतर २००१ साली, जेव्हा मोदी यांनी निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश केला तेव्हा ही सुस्पष्टता प्रत्येक निवडणूकीत वारंवार दिसून आली. लोकांशी जोडले जाण्याची आणि त्यांच्या गरजा तसेच आकांक्षा समजून घेण्याची नरेंद्र मोदी यांची क्षमता खरोखर फायदेशीर ठरली आहे.