पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले. इतिहास केवळ पुस्तकात बंदिस्त राहिला तर तो समाजाला प्रेरित करू शकणार नाही, असे पंतप्रधानांनी त्यांच्या उत्तरात सांगितले. प्रत्येक युगामध्ये इतिहासाला जिवंत करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. ज्यावेळी काँग्रेसचा जन्म देखील झाला नव्हता, तेव्हा 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामात लोक देशासाठी त्यांच्या प्राणांची आहुती देत होते. कमळ तेव्हाही होते आणि आजही आहे, नरेंद्र मोदी म्हणाले.