30 ऑगस्ट 2016 रोजी गुजरातमध्ये जामनगर जिल्ह्यात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे काही पत्रकार आणि कॅमेरामॅनचे प्राण वाचले.
गुजरातमध्ये सौराष्ट्र या पाण्याची कमतरता असलेल्या क्षेत्रात सिंचन उपलब्ध करुन देणाऱ्या सावनी योजना या महत्वाकांक्षी प्रकल्पात हा उद्घाटन समारंभ होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री विजय रुपानी आणि इतर प्राधिकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचून तेथील तयारी पाहत होते. धरणातून जलप्रवाह सुरु करणाऱ्या बटणाचेही पंतप्रधान निरीक्षण करत होते. त्याचवेळी त्यांनी बटण दाबल्यानंतर खाली येणाऱ्या प्रवाहाच्या ठिकाणी पाहले असता, त्यांना तेथे काही लोक उभे असल्याचे दिसले. आपण किती धोकादायक ठिकाणी उभे आहोत, याची कल्पना नसलेले कॅमेरामन तेथे शांतपणे उभे होते. मोदीजींनी हे पाहिले आणि त्यांच्या दिशेने हात उंचावून, टाळ्या वाजवत त्यांचे लक्ष वेधले, धोक्याची सूचना दिली आणि तेथून निघून जाण्यास सांगितले. यामुळे योग्य वेळी अनेकांचे प्राण वाचले.
त्यानंतर एका वृत्त संस्थेशी बोलताना तेथील एका कॅमेरामॅनने पंतप्रधानांनी आपल्याला नवे आयुष्य दिले आहे, असे सांगितले.
पंतप्रधान मोदी यांचे प्रसंगावधान पुन्हा एकदा कौतुकास पात्र ठरले.
5 एप्रिल 2015 रोजी विज्ञान भवन येथे मुख्यमंत्री आणि मुख्य न्यायमुर्तींच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान उपस्थित असता, एक फोटोग्राफर पडला. त्याला उठवण्यासाठी मदतीचा हात देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. हा प्रसंग सुध्दा नंतरच्या काळात बराच लोकप्रिय ठरला.